नाशिक दिनकर गायकवाड सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नाशिक अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक १ व युनिट क्रमांक ३, आडगाव, नाशिक या वसतिगृहात सन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत,असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह युनिट क्रमांक १ च्या गृहप्रमुख राजेश्वरी साखरे व युनिट क्रमांक ३ गृहप्रमुख विजयश्री बाबर यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय
वसतिगृह, आडगाव या वसतिगृहात अनुसूचित जाती १२४ जागा, मातंग ४२ जागा, मेहतर ६६ जागा, अनुसूचित जमाती १० जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती १६ जागा, इतर मागासवर्गीय १० जागा, विशेष मागास प्रवर्ग १४ जागा, दिव्यांग १९ जागा व अनाथ २ याप्रमाणे जागा उपलब्ध आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ या वसतिगृहात अनुसूचित जाती ७८ जागा, मातंग १४ जागा, मेहतर २९ जागा, अनुसूचित जमातीसाठी १ जागा, विजाभजसाठी ४ जागा, इतर मागासवर्गीयांसाठी २ जागा, विशेष मागास प्रवर्ग ७ जागा, दिव्यांग १९
जागा व अनाथ ४ अशा जागा उपलब्ध आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्रमांक ३, आडगाव, या वसतिगृहात कनिष्ठ अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती ११ जागा, मातंग ३ जागा, मेहतर ३ जागा, विजाभज १ जागा, इमाव १ जागा, विमाप्र १ जागा व दिव्यांग २ जागा उपलब्ध आहे. वरिष्ठ अभ्यासक्रमासाठी मातंग ३ जागा, मेहतर ३ जागा, अनुसूचित जमाती १ जागा उपलब्ध आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती २४ जागा, मातंग ९ जागा, मेहतर १२ जागा, अनुसूचित जमाती १ जागा, विजाभज २ जागा, विमाप्र १ जागा, दिव्यांग २ जागा उपलब्ध आहे.