नाशिक दिनकर गायकवाड येथील कवी सोमनाथ पगार न यांना जून अखेर वैश्विक महामारी कोरोना काळातील भयावह न परिस्थितीचा साहित्यिक दस्त ऐवज कठरलेल्या 'कारुण्यबोध' या त्यांच्या दुसऱ्या कवितासंग्रहाला नाशिक येथील भावसुमन प्रकाशना तर्फे संध्या राजन कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा साहित्य साधना पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
प्राचार्य व कवी राज शेळके, प्राचार्या तथा ज्येष्ठ कवयित्री डॉ.शकुंतला चव्हाण, कवयित्री सुशीला पिंप्रीकर, साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष लेखक संजय गोराडे, पत्रकार पीयूष नाशिककर, भावसुमन प्रकाशनाचे प्रकाशक व कवी विलास पंचभाई आदी मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथील समर्थ मंगल कार्यालयात त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच सोमनाथ पगार यांना कऱ्हाड येथे आणखी एक पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या 'वेदनेचे काटे' या साहित्यिक सोमनाथ पगार यांच्या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय 'स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार' हा मानाचा पुरस्कार कन्हाड येथील अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे सामाजिक संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला. यावेळी कन्हाड परिसरातील मान्यवर उपस्थित होते.