राहाता प्नतिनिधी तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांकडून येणाऱ्या वाढत्या समस्या लक्षात घेतामा. मंत्री बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील पानंद रस्ते ,शेत रस्ते आणि शिव-रस्ते तातडीने खुले करण्याचे येथील - प्रहार जनशक्ती पक्षाचे शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास नुकतेच निवेदन देण्यात आले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेत-पानंद रस्त्यांसंदर्भात काढलेल्या आदेशाचे पालन करून आपल्या अधिनिस्त अधिकाऱ्यांना(प्रांत ते तलाठीपर्यंत) सर्वांना या संदर्भात लेखी सूचना करा अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी उपस्थित प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी -प्रहार जनशक्ती पक्षाचे राहता तालुका अध्यक्ष .दिनेश राजे शेळके पाटील, प्रहार राहता तालुका संघटक वसंतराव काळे पाटील, प्रहार शेतकरी संघटना राहता तालुकाध्यक्ष - बबनराव डांगे, राहता तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सचिव- सुरेश कांतीलाल गुगळे , प्रहार जनशक्ती पक्ष राहता तालुका समन्वयक- जगन्नाथ मामा सरोदे पाटील ,प्रहारचे नांदुरखी शाखा अध्यक्ष . विक्रम दाभाडे पाटील, राहाता येथील प्रहारचे कार्यकर्ते .गणेश सोनवणे सुनील आहेर संतोष शिंदे आदींनी शासनाचे लक्ष वेधले