नाशिक दिनकर गायकवाड येथील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देऊन तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणी ही २६ वर्षीय असून, ती भद्रकाली परिसरात राहते.आरोपी आसिफ सय्यद (रा. कॉलेज रोड, नाशिक) फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून गंजमाळ, तेगरीन लॉज, तळेगाव फाटा, त्र्यंबकरोड,नाशिक येथे घेऊन जात तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर तरुणीने लग्न करण्याबाबत विचारणा केली असता आरोपी आसिफ सय्यद याने लग्नास नकार देऊन तरुणीची फसवणूक केली. या प्रकरणी पीडित तरुणीने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आसिफ सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
