नाशिक दिनकर गायकवाड सशक्त, सुजान व बलशाली समाज घडवण्याचं काम हे गुरु करत असतात व गुरुने एकदा का पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची उर्मी शिष्याच्या मनामध्ये निर्माण केली तर शिष्य गुरू च्या मार्गदर्शनाने जीवनामध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन बाहे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी दिंडोरी तालुक्यातील बाऱ्हे येथे केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून परिसरातील सर्व गुरुजनांना आंमत्रित करुन त्यांचा यथोचित सन्मान बान्हे पोलीस ठाणे येथे करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रदीप गीते पुढे म्हणाले की, पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व गुरुचा गुरूंचा यथोचित सन्मान करून त्यांच्याप्रती पोलिस दलाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तेच खऱ्या अर्थाने चांगला समाज निर्माण करण्याचं काम करतात आणि समाज चांगला निर्माण झाल्यास समाजातील विकृती नक्कीच कमी होते म्हणून गुरूंचे काम अतिशय मोलाच आहे.
प्रसंगी मुख्याध्यापक व शिक्षक यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांचा यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक व गुरुजन हे अतिशय भावनिक झाले होते. यावेळी देविदास देशमुख, पांडुरंग वाघमारे,अभिजित घुले, पूना चौधरी, बहिरम, नंदू देशमुख, चिंतामण महाले, बाळू गांगुर्डे, मोतीराम कुवर आदी उपस्थित होते.