रस्त्याच्या खेळ खंडोबाकडे सा.बा.विभाग आणि लोकप्रतिनिधींचे अक्षरशः दुर्लक्ष
नाशिक दिनकर गायकवाड नाशिकपासून अवघ्या ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेठ या आदिवासी तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था आजही कायम आहे.त्यामुळे आदिवासी भागातील रस्त्यांचा कायापालट होणार कधी? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
पेठ तालुक्यातील गाव-पाड्यांना जोडणारे अनेक लहान-मोठे रस्ते आहेत.वर्षानुवर्षे रस्त्यांची दुर्दशा आजही कायम आहे. मात्र कोणत्याही सरकारकडून ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे होत नसल्याचे नागरिकांकडून पेठ तालुक्यात १ लाख ३५ हजार लोकसंख्या आहे. ७३ ग्रामपंचायत आणि अनेक पाडे वस्ती जोडली आहेत.मात्र या पेठ तालुक्याला जोडणाऱ्या स्त्यांची कामे व्यवस्थितरित्या होत
नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.पेठ तालुक्यातील करंजाळी कोहोर ते हरसूल रस्ता, पेठ ते जोगमोडी रस्ता, तिरडे ते करंजाळी,
पेठ तालुक्यात रस्त्यांची चाळण झाली आहे.तालुक्यात मक्ते दारांकडून थातूरमातूर कामे निकृष्ट केली जातात. त्यामुळे खेड्यातील रस्त्यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. वर्षभरातच रस्ता खराब होतो. याबाबत रस्त्यांची गुणवत्ता महिनाभरात सुधारली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटांकडून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
गिरीश गावित, तालुकाध्यक्ष - रा. कॉ. शरद पवार गट
जोगमोडी ते उभिधोंड मार्गे करंजाळी, आसरबारी ते चिलारपाडा हे तालुक्याला जोडणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. तसेच ग्रामीण आदिवासी भागातील रानविहिर
डौलपाडा ते पेठ हायवे पर्यंतचा रस्ता, तसेच कोहोर ते रुईपेठा, दोनवाडे मार्गे धुळघाट- पाटे पर्यंतचे रस्ते पेठच्या पश्चिम भागातील रस्त्यांचा समावेश असून ग्रामीण भागातील महत्त्वाच्या खेड्यापाड्यांना जोडणारे रस्ते आहेत. तालुक्यातील काही रस्त्यांचे डांबरीकरण बाकी असून, रस्त्यांवरील खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत.
परंतु काही भागात डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते आणि बुजविण्यात आलेले खड्डे उखडून निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालक आणि नागरिक बैलाचे आहेत काबाडलेल्या समस्यांना तोंड देण्याची केळ आली आहे.दुचाकी चालकांचे खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे रस्त्यांची समस्या सुटणार तरी कधी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.