संगमनेर प्रतिनिधी परिवहन मंत्री.नामदार प्रताप सरनाईक सोबत संगमनेर मधील विविध परिवहन विषयक प्रश्नांवर व मागण्यां संदर्भात २४ मार्च रोजी बैठकीत सविस्तर चर्चा केली होती. त्या पाठपुराव्याला यश मिळून २९ मार्च रोजी पहिल्या ५ नवीन बसेस संगमनेर आगारात दाखल झाल्या होत्या आणि आज आणखी ५ नवीन बसेस दाखल झाल्याने केवळ तीन महिन्यांत एकूण १० नव्या बसेस संगमनेरकरांच्या/प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
या नवीन बसच्या लोकार्पण व वाहनपूजनाचा कार्यक्रम आज संगमनेर बसस्थानकात उत्साहात पार पडला. धार्मिक रिती रिवाजानुसार नवीन बसेसची पूजा करून सहकाऱ्यांसह बसची सवारी केली. या नवीन बस पाहून मनाला समाधान वाटलं. संगमनेर आगारातील अपुऱ्या
