पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ.दीपक टिळक यांचे नुकतेच निधन झाले,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरीवाडा येथे टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.यावेळी दीपक टिळक यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे,स्वर्गीय दीपक टिळक यांचे पुत्र रोहित टिळक, स्नुषा प्रणिती टिळक, मुलगी गीताली टिळक, नातू रौनक टिळक आदी उपस्थित होते.