राष्ट्रीय महिला आयोग – "आपके द्वार"
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा.विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणी पार पडली.
जिल्हाधिकारी.जितेंद्र डुडी ,पुणे महानगरपालिका आयुक्त. नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त. शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलीस सहायुक्त डॉ..शशिकांत महावरकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती मनीषा बिरारीस, अपर पोलीस आयुक्त पुणे.पंकज देशमुख या प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पार पडलेल्या या सुनावणीमध्ये पोलीस,आरोग्य, शिक्षण, परिवहन, कामगार कल्याण, समाजकल्याण, अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास अशा विविध विभागातील तक्रारी जाणून घेत त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. महिला भगिनींच्या अनेक प्रलंबित प्रकरणांना या जनसुनावणीद्वारे दिलासा मिळाला, हे विशेष समाधानकारक आहे!
महिलांच्या हक्कांसाठी सजग प्रशासन समर्पित सेवा!
राष्ट्रीय महिला आयोग आपके द्वार जनसुनावणी महिला
