संगमनेरात लहुजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीने अभिवादन
संगमनेर संजय गायकवाड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात संघर्ष करून आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले तसेच त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीच्या विरोधात अन्यायाचा प्रतिकार करत समाजप्रबोधन केले अशा महान लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी विधिमंडळाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपण स्वतः आवाज उठवित पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
लहुजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आमदार खताळ यांनी सर्वप्रथम लोकशाहीर साठे यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे भाजप माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी,महिला जिल्हा उपप्रमुख दिपाली वाव्हळ,महिला शहरप्रमुख वैशाली तारे, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, रेखा गलांडे ,रेश्मा खांडरे ,कांचन ढोरे, रोहिणी हारदे,भारती पगारे, दीपक खरात, राम सुरळकर, दीपक आव्हाड, संजय शिंदे, अण्णा कसबे ओम खडांगळे श्याम राणे योगेश घोगरे गणेश सस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न घ्यावा अशी मागणी यावेळी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश सचिव विनायक माळवे शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी मंजाबापू साळवे सपना जाधव किशोर वाघमारे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली.तुमच्या मागणीचा विचार करून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण स्वतः विधिमंडळात मागणी करून शासन दरबारी पाठपुरावा करू असा विश्वास त्यांनी दिला
आमदार खताळ पुढे म्हणाले की महापुरुषांच्या स्मृतींना आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे केले जात असतात. लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे हे कमी शिकलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून शोषित व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी कायम संघर्ष केला. त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचाराचा वारसा घेऊन आपण सर्वजण मार्गक्रम करू या असेही आमदार खताळ यांनी सांगितले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संगमनेर शहरातील नवीन नगर रोड लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आहे परंतु ते दुर्लक्षित झाले आहे अशी खंत समाज बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर व्यक्त केली.त्यावर आ खताळ म्हणाले की लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्याबाबत च्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना देऊन या परिसराचे सुशोभीकरण केले जाईल असा ही विश्वास आमदार खताळ यांनी देताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केले प्रस्ताविक शिवसेनेच्या तालुका संघटक मंजाबापू साळवे यांनी प्रास्ताविक केले स्वागत लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष बलसाने यांनी केले तर आभार रिपाइंचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी मानले