सांगली सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा नियोजन आढावा बैठक झाली.
बैठकीत मतदारसंघातील विविध मागण्या मांडल्या.त्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम सुरू करणे,स्व. शिवाजीराव देशमुख स्मारकासाठी निधी व मान्यता देणे,कासेगाव पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारत उभारणे,घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्याचा निर्णय अमलात आणणे, तसेच खाजगी शाळांना शालेय क्रीडा साहित्य मंजूर करण्याबाबत निर्णय घेणे या मागण्या करण्यात आल्या.
