नाशिक येथील दहीहंडी उत्सवात ‌खासदार निलेश लंके सहभागी

Cityline Media
0
नाशिक प्नतिनिधी शहरातील दंडवत युवा फाउंडेशन व निलेश लंके प्रतिष्ठान नाशिक आयोजित दहीहंडी उत्सव जल्लोषात व अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अहिल्यानगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके उपस्थित होते यावेळी त्यांचे स्वागत व येथोचित सन्मान करण्यात आला.
या भव्य सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन आदि नागरे यांनी केले होते.तसेच विठ्ठल (मामा) आव्हाड आणि सागर नागरे यांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम अधिक सुंदर झाला.

विशेष आभार सर्व आयोजक व कार्यकर्त्यांचे ज्यांच्या परिश्रमामुळे एवढे उत्तम नियोजन व भव्य दहीहंडी सोहळा यशस्वी झाला.यावेळी, खासदार भास्कर भगरे महेश भाऊ हिरे ,आमदार सीमा हिरे, योगिता अपूर्व हिरे, किरण बाळा दराडे,अजय बागुल, नगरसेवक प्रवीण(बंटी)तिदमे, मुकेश शहाणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड, पुंजाराम गामणे,छबूभाऊ नागरे , मनोज खांदवे, छाया देवांग, संतोष सोनपसारे, देवाजी पाटील, अजिंक्य गीते, बाळासाहेब पाठक,निखिल पवार, शरद फडोळ, सुनिल जगताप, मदन जमदाडे, गोपाळ घुगे, मंदाकिनी जाधव, डॉ.वैभव महाले, प्रवीण पाटीलतसेच अनेक मान्यवर, पदाधिकारी व गोपाल बांधव उपस्थित होते.

हा उत्सव नाशिकच्या परंपरा, एकोपा आणि उत्साहाचे दर्शन घडवणारा ठरला असे मत यावेळी खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!