नाशिक दिनकर गायकवाड येथील महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचा आउटसोर्सिंग ठेका कंपनीला दिला असल्याने चतुर्थी श्रेणीतील कामगारांवर अन्याय झाला आहे या विभागात बहूजन समाजातील लोकांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत दलित विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलास तेलोरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या आहेत.-
निवेदनात कैलास तेलोरे म्हणाले नाशिक महानगरपालिका यांचे मार्फत आउटसोर्सिंग व्दारे ठेका देण्यात येत आहे.यामुळे येथील स्थानिक मागासवर्गिय बेरोजगार तरुणांवर अन्याय आहे नाशिक मनपाने देऊ केलेला आऊटसोर्सिंगचा सफाई ठेका ताबडतोब थांबुन चतुर्थ श्रेणीतील कामगारांवर होणारा बेरोजगाचा अन्याय थांववावा तसेच जे सफाई कामगार आता भरती होणार आहेत त्यांचे भविष्य हे अंधारमय होणार आहे.सफाई ठेक्याची जी मुदत असेल तेवढेच दिवस या सफाई कामगारांना काम मिळणार आहे ,त्या नंतर हे सर्व कामगार पुन्हा बेरोजगार आणि बेकार होणार, सफाई कामगारांना ठरवून दिलेला पगार व प्रत्यक्ष दिला जाणारा पगार यात तफावत असणार आहे.,या सफाई कामगारांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाणार नाही.त्या मुळे त्यांना अनेक आजारांची लागण होण्याची
शक्यता आहे.
कंत्राटी सफाई कामगारांना केंद्र /राज्य शासनाच्या देण्यात येणाऱ्या सुविधा आणि लाभ मिळनार नाही. संबंधित कामगारांच्या कुटुंबीयांचे देखील भविष्य अंधकारमय होणार आहे.त्यातच कुटुंबीयांचे आरोग्य, शिक्षण असे.प्रश्न निर्माण होणार आहेत संबंधीत सफाई ठेक्याची मुदत संपल्या नंतर सर्वच्या सर्व कंत्राटी कामगार हे पुम्हा बेरोजगार होणार आहेत.त्या पैकी काही कामगार हे वयोमर्यादा ओलंडणार आहेत.त्या नंतर त्यांना कोणी काम देणार नाही. या सर्वच कामगारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य सर्वोतोपरी खराब होऊन त्यांचे नुकसान होणार आहे.
सदर या कंत्राटी करती मध्ये जास्तीत जास्त कामगार हे मागासवर्गिय समाज जास्त असणार आहेत त्या मुळे या सर्व गोष्टींचा घटनांचा विचार करत असतांनाच नाशिक महानगरपालिकेने ही भरती न करता, सफाई कामगारांची कायम स्वरुपी भरती करावी.व कंत्राटी कामगाराबरोबरच सर्व मागासवर्गियांना संधी मिळून त्यांच्यावर अन्याय न होता न्याय मिळेल
जर सदरची आऊटसोर्सिंग व्दारे साफाईचा ठेका दिला गेला तर नाशिक महानगरपालिकेला याचे परिणाम भोगावे लगतील,तसेच दलित विकास महासंघाच्या वतीने सर्व प्रकारची आंदोलने केली जातील मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर गांभिर्याने विचार करून सदरची आउटसोर्सिग द्वारे केली जाणारी कंत्राटी कामगार सफाई भरती रक्षद्द करावी असे निवेदनाद्वारे कैलास तेलोरे यांनी सांगितले आहे