नाशिक दिनकर गायकवाड:- डायग्नोस्टिक सेंटरमधून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना मुंबई नाका येथे घडली.
फिर्यादी सिद्धेश्वर ज्ञानोबा कदम हे मुंबई नाका येथील साई हायटेक डायग्नोस्टिक सेंटर येथे गेले होते. त्यावेळी त्यांचा १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली आहे.