नाशिक दिनकर गायकवाड पंचवटी येथील घनकचरा व्यवस्थापनातील महिला कर्मचारी श्रीमती हिराबाई आबाजी शिंदे या नुकत्याच सेवानिवृत्त होत असून तरी त्यांचे नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे किशोर कोठावदे अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे वृक्ष व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
हिराबाई शिंदे या मनपा घनकचरा व्यवस्थापनात पश्चिम विभाग व पंचवटी विभागात यांनी सफाई कर्मचारी म्हणून कार्य केले तरी ते नाशिक महानगरपालिका पंचवटी विभागातून कार्यमुक्त होत असून त्यांची एक जागा रिक्त होत आहे तरी पण नाशिक महानगरपालिका यांनी घनकचरा व्यवस्थापनातील रिक्त जागा भरण्यासाठी त्यांच्या वारसा हक्काने त्यांच्या घरातील सदस्यांना लवकरात लवकर कामावर रुजू करण्यात सहकार्य करावे अशी त्यांच्याकडून मनपाला विनंती केली गेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे सेवानिवृत्तीनंतर त्यांचे उर्वरित आयुष्य दीर्घायुष्य लाभो त्यांच्या कुटुंबात आनंद दरवत राहो अशा सदिच्छा सर्व पंचवटी घनकचरा व्यवस्थापनातील अधिकार कर्मचारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या