मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक वर्षांपासून संगमनेर शहरातील इंदिरानगर भागात सर्वे नं. १०६ (४४२) येथील वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारा निर्णय झाला.
सदर नागरिकांच्या मालकी हक्कासाठी,तसेच महसूल अभिलेखातील पोकळीस्त व अन्य हक्काच्या नोंदी रद्द करून प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावावर सातबारा व सिटी सर्वे अभिलेख करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. आतापर्यंत केलेले प्रयत्न:-
११ जुलै२०२५– या प्रकरणा संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना पत्राद्वारे मागणी केली.
१४जुलै २०२५ – मंत्री महोदयांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकरणाचं गांभीर्य मांडलं.
नुकतेच या बैठकीला अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तसेच अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, संगमनेरचे तहसीलदार आणि इतर महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत संगमनेर येथील वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या समस्यांविषयी सविस्तर चर्चा झाली.
लवकरच प्रत्यक्ष कब्जा धारकांच्या नावे नोंद प्रक्रिया राबवली जाणार आहे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबद्दल मी राज्य शासनाचे आभार मानतो असे आमदार सत्यजित तांबे म्हणाले.