वाराणसीत प्रधानमंत्र्याच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांना प्रदान

Cityline Media
0
उतर प्रदेश सिटीलाईन न्यूज नेटवर्क वाराणसीत  “किसान सन्मान समारोह” कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जनकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद आणि “प्रधानमंत्री किसान सम्मान निधी” योजनेचा २० वा हप्ता जवळजवळ १० कोटी शेतकऱ्यांना २०५०० कोटी निधी हस्तांतरित; “प्रधानमंत्री किसान सम्मान निधी” योजनेअंतर्गत सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३.९० लाख कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आला आहे.
वाराणसी येथे आयोजित कार्यक्रमात यावेळी प्रधानमंत्र्यानी सुमारे २२०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले, या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यटन, शहरी विकास, सांस्कृतिक वारसा यासह विविध क्षेत्रांचा समावेश होता.सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या जलसाठ्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने,पंतप्रधान यांनी विविध कुंडांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण आणि देखभालीच्या कामांची पायाभरणी केली. 

सदर कार्यक्रमाचे जळगांव जिल्हा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र,मुमराबाद (जळगांव) येथे खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित राहून उपस्थित केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचे लाभार्थी व शेतकरी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

यावेळी खासदार मा.श्रीमती स्मिता वाघ,आमदार. सुरेश भोळे, प्रमुख शास्रज्ञ अटारी पुणे डॉ. सैय्यद शाकीर अली,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.कुर्बान तडवी,वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख डॉ.हेमंत बाहेती,कृषिभूषण श्री.समाधान पाटील स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते, शासकीय अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!