जळगांव सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कृषि विभाग,जळगाव,आत्मा जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, व रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने "रानभाजी महोत्सव" चे आयोजन करण्यात आले असता, सदर कार्यक्रमास अनेक राजकीय दिग्गजांनी तसेच राज्य मंत्री युवा कल्याण आणि खेळ मंत्रालयाच्या खासदार रक्षा खडसे यांनी भेट देऊन, शेतकऱ्यांकडून विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेतली.
जळगाव जिल्हयात मागील ५ वर्षांपासुन रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यंदा सुध्दा जळगाव जिल्हयातील सातपुडा पर्वत रांगेतील व जिल्हयातील इतर जंगल परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्यांचे महत्व,त्यातील जीवनसत्वे, खनिजे आणि औषधी या गुणधर्माबाबत शहरवासीयांना महत्व पटवुन देणेसाठी कृषी विभाग, जळगाव, आत्मा जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, व रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने "रानभाजी महोत्सव" चे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवात रानभाज्यांपासुन तयार करण्यात आलेल्या पाक कलाकृती स्पर्धेचे आयोजन सुध्दा करण्यात आले. यावेळी महराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या आर्थिक सहकार्यातुन प्रवासी वाहन कर्ज योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वाहनाचे वाटप करण्यात आले.