शिर्डी प्नतिनिधी देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांची श्री साईबाबांप्रती अपार श्रद्धा आहे. भक्त आपल्या भावनांना वेगवेगळ्या कला व माध्यमांतून व्यक्त करत असतात.अशाच एक आगळ्यावेगळ्या भक्तीची नुकतीच प्रचिती शिर्डीत झााली.विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथील रहिवासी व साईभक्त कलाकार मोक्का विजय कुमार यांनी भरड धान्यांपासून साकारलेला श्री साईबाबांचा अत्यंत सुंदर व कलात्मक फोटो आज श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला.
या छायाचित्रात त्यांनी बाजरी, ज्वारी,तीळ,काळे तीळ यांसारख्या विविध भरड धान्यांचा कुशलतेने वापर करून श्री. साईबाबांचे तेजस्वी रूप साकारले आहे.सदर कलाकृती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यानंतर संस्थानच्या वतीने देणगीदार श्री साईभक्तांचा सत्कार करण्यात आला.