नाशिक दिनकर गायकवाड मुलास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी एका महिलेची चार लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी ज्योती लक्ष्मीकांत गायकवाड (रा. तुळजाभवानीनगर, पाथर्डी शिवार, न नाशिक) या मुलासाठी नोकरी शोधत होत्या.त्यादरम्यान फिर्यादी यांच्या मुलाची वर्गमैत्रीण भारती प्रमोद कुमावत (रा. लेखानगर, शिवाजी चौक) हिने त्यांना सांगितले की, त्यांच्या ओळखीचे असलेल्या स्वप्नील रामदास परदेशी (रा. मनमाड, ता. नांदगाव) यांच्या मार्फत सरकारी नोकरी लावून देते.
त्यासाठी चार लाख रुपये द्यावे लागतील.ती ओळखीची असल्याने तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तयारी दर्शविली. भारतीने एकदिवस स्वप्नील परदेशी याच्या सोबत फिर्यादी व त्याच्या मुलाचे फोनवर बोलणे करून दिले. त्यानंतर त्यांनी २१ जून ते ६ जुलै २०२४ दरम्यान वेळोवेळी त्याच्या खात्यावर फोनपेद्वारे चार लाख रुपये पाठविले.
नंतर फिर्यादी यांचा मुलगा रितेश व त्या स्वतः स्वप्नील परदेशी व भारती कुमावत यांना मुंबईत सीएसटी येथे भेटले त्यावेळी त्याने सांगितले की, भारतीचे आता प्रोमशन होऊन तिची बढती चिफ इंजिनीअर म्हणून होणार आहे. तिच्या रिक्त जागेवर रितेशला ज्युनिअर इंजिनीअर सेंट्रल पब्लिक वर्क डिर्पाटमेंट, संभाजीनगर येथे नेमणूक करून देण्याचे ठरले.
नंतर काही काळ होऊनही त्याला नोकरीबाबत कोणतेच पत्र न आल्याने त्यांनी भारती व स्वप्नीलला वारंवार विचारणा केली.मात्र त्यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली.नंतर स्वप्नीलने रितेश यांना बँक ऑफ महाराष्ट्र मनमाड शाखेचा एक चेक दिला. तो रितेश यांना वटवण्यासाठी टाकला असता त्या चेकवर स्टॉप पेपेंट केल्याचे समजते.
म्हणून त्यांना स्वप्नील परदेशी यांना संपर्क साधला. त्यांनी पुन्हा चेक भरण्यास सांगितला असता तो तीन वेळा परत आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रितेश यांच्या आईने स्वप्नील परदेशी व भारती कुमावत यांच्याविरूद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस हवालदार पारणकर करीत आहेत.