नाशिक दिनकर गायकवाड प्रभाग क्रमांक १३ गंजमाळ, पंचशीलनगर, म्हसोबावाडी या परिसरामध्ये शिवसेना (शिंदे गट) सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले.
५०० सभासद फॉर्म भरून शिवसेना सचिव राम रेपाळे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना आमदार सुहास कांदे, शिवसेना उपनेते विजय करंजकर यांच्याकडे देण्यात आले. प्रभाग क्रमांक १३ मध्ये पक्षवाढीसाठी अहोरात्र काम करू व प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेनेचे चारही नगरसेवक निवडून आणू, अशी ग्वाही आरोग्य सेवक दीपक डोके यांनी दिली.