येवल्यातील सार्वजनिक मंडळे आणि पोलीस अधिकाऱ्यांची शांतता बैठक उत्साहात

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड येवला येथील माऊली लॉन्समध्ये गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या अध्यक्ष व कार्यकर्ते यांची बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
येवला शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर असलेले खड्डे व अतिक्रमण, तसेच लोंबकळणाऱ्या विद्युत तारा व गंगा दरवाजा येथील गणेश कुंड, अंगणगाव येथील अहिल्या घाट स्वच्छ करण्याची मागणी शाहू शिंदे,आनंद शिंदे यांनी केली. याप्रसंगी भोलानाथ लोणारी, किशोर सोनवणे, शहर काजी, शाहू राजे शिंदे, पप्पू सस्कर, महेंद्र पगारे, इजाज शेख, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, अविनाश कुक्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डीवायएसपी बाजीराव महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, की पारंपरिक वाद्याचा वापर करावा व वेळेचे बंधन पाळावे,असे आवाहन केले. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नगरपालिका व वीज वितरणचे अधिकारीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भूषण शिनकर यांनी केले. आभार येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!