घरफोडी करून सोने चांदीचा ऐवज लंपास करणारे दोन आरोपी जेरबंद

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड अंबड पोलीस ठाण्याच्या
गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ३६ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज हस्तगत केला आहे.
घरफोडी करणारा आरोपी चेम्पियनसिंग मिलनसिंग भादा (वय २५, रा. वनश्री कॉलनी, मोहाडी, उपनगर, ता. जि. धुळे) याला धुळ्यातील मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत चोरीचे सोने खरेदी करणारा सोनार गणेश सोमनाथ विभांडिक (वय ५६, रा. जे.बी. रोड, किसन बट्टी, धुळे) यालाही अटक करण्यात आली.

अंबड पोलीस ठाण्यात फिर्यादी सलिमा नाजिम शेख (वय ४५, रा. बुरकुले संकुल, सिडको, नाशिक) यांनी २ एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३० मार्च रोजी घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचे पत्रे उचकटून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीकडून ३ ग्रॅम सोन्याची व ६० ग्रॅम चांदीची लगड असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पडोळकर,पो.हवा. योगेश देसले, संजय सपकाळे, सचिन करंजे,अनिल गाढवे, तुषार मते, मयुर पवार, राहुल जगझाप, राकेश पाटील, दीपक निकम, संदीप भुरे,सागर जाधव आदींनी केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!