दुतोंड्या मारुती मंदिर परिसरात पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता लक्षात घेऊन नाशिक पोलीस आयुक्तालय व पंचवटी पोलिस ठाण्यातर्फे गोदा घाटावरील दुतोंड्या मारुती मंदिरामागे असलेल्या प्रांगणात अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान तसेच स्वच्छ गोदा व सामाजिक जनजागृती अभियान राबविण्यात आले.
अध्ययन डिफेन्स अकॅडमी यांच्या सहकार्याने पंचवटी पोलीस ठाण्यामार्फत राबविण्यात आलेल्या अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांनी नुक्कड नाटक व विविध उपक्रम सादर केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ, गुन्हे शोध पथकाची टीम, गोपनीय विभागातील अंमलदार, अध्ययन अकॅडमीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

स्वच्छ गोदा सामाजिक जनजागृती अभियान राबविण्यात येऊन नागरिकांनी नदीपात्रात प्रदूषण करू नये, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नदीपात्रात होणारे प्रदूषण रोखणे काळाची गरज असल्याचे सांगून जनजागृती करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!