सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांची भविष्यवाणी अखेर खरी
दिपक कदम जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटूबांना वैयक्तिक घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची शासन कल्पना आहे परंतु श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर मध्ये या योजनेचे तीन तेरा आणि नऊ बारा झाले असून येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांनी याबाबत केलेली भविष्यवाणी सत्यात उतरताना दिसतेय.
सामाजिक कार्यकर्ते नाईक यांनी बेलापूर जलजीवन योजनेतील बोगस कामांवर सतत जनजागृती केली. नुकतेच त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जलजीवन सप्ताह सदरात लिहिले होते की “पाईपलाईन टाकल्यानंतर योग्य क्युरिंग केले जात नाही, त्यामुळे पुढे समस्या उद्भवतील” असा स्पष्ट इशारा त्यातून दिला होता.आणि तो इशारा आज गावात सत्यात उतरला आहे.
रस्त्यांची दुरवस्था – वाहनधारक, विद्यार्थी,नोकरदारांचे हाल पाईपलाईन टाकल्यानंतर क्युरिंग न केल्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, चिखल आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला आहे काम झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे फलक लावल्या गेल्या नव्हते त्यामुळे अचानक गाड्या फसल्या व त्यांचे काहीशा प्रमाणात नुकसान देखील झाले सुदैवाने जीवित हानी झाली नाही सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना, नोकरीवर जाणाऱ्यांना आणि वाहनधारकांना प्रचंड गैरसोय झाली. नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.
दरम्यान जबाबदार अधिकारी अनुपस्थित
या कामात आणखी एक गंभीर बाब उघड झाली आहे. जलजीवन योजनेचे काम सुरू असताना ना ग्रामपंचायतीचे कोणतेही कर्मचारी उपस्थित होते, ना सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी.जबाबदार अधिकारी अनुपस्थित असताना हे काम केले गेले, शिवाय हे काम रात्रीच्या वेळी करण्यात आले. त्यामुळे पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
ग्रामपंचायतीचे धक्कादायक उत्तर
अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्यांना फोन करून विचारणा केली असता “जलजीवन कामाशी आमचा काही संबंध नाही” असे उद्धट उत्तर मिळाले. या प्रतिक्रियेवर नागरिक अधिक संतप्त झाले आहेत. “गावातील समस्या सोडवणे हा तुमचा अधिकार आहे, मग जबाबदारी कोण घेणार?” असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
विक्रम नाईक यांची दूरदृष्टी – जनतेकडून कौतुक
या सर्व प्रकारावर नागरिक म्हणाले – “विक्रम नाईक यांनी आधीच इशारा दिला होता. त्यांची दूरदृष्टी खरोखर कौतुकास्पद आहे.” अनेकांनी खुलेपणाने त्यांचे अभिनंदन केले आणि प्रशासनावर कठोर टिका केली.
जनतेचा इशारा – दोषींवर कारवाई करा
गावकऱ्यांनी स्पष्ट केले की, “जलजीवन योजनेच्या नावाखाली बोगसगिरी करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर जनतेचा संघर्ष उभारला जाईल.”