नाशिक दिनकर गायकवाड येथील मखमलाबाद रोड पंचवटीतील संतोष जवाहरलाल रखमे यांची पक्षातील निष्ठा व पक्षसंघटनेतील काम बघुन नुकतीच त्यांची नाशिक शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग शहर चिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,मंत्री नामदार छगन भुजबळ व प्रदेश अध्यक्ष मा.खा.सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येयधोरणे व शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह संतोष रखमे नियमित सक्रिय राहतील असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या सहीने निवडीचे पत्र नुकतेच संतोष रखमे यांना प्राप्त झाले.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
