बीड सिटीलाईन न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील ९ कोटी ७० लाखांहून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये २०,५०० कोटी रुपयांची थेट आर्थिक मदत जमा करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर, अंबाजोगाई येथील डिघोळअंबा येथील दीनदयाल शोध संस्थान, कृषि विज्ञान केंद्र येथे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते होणाऱ्या लाभ हस्तांतरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.
याप्रसंगी किसान गोष्टी' या उपक्रमाअंतर्गत कृषी तज्ञांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आले.तसेच,कृषी विभाग अंबाजोगाईच्या अधिकृत युट्यूब चॅनेलचे देखील उद्घाटन या कार्यक्रमात करण्यात आले.
याप्रसंगी, कृषी उपसंचालक श्री.जाधव ,अंबाजोगाईचे उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, तालुका कृषी अधिकारी. रवि मुंडे , कृषि विज्ञान केंद्र प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.वसंत देशमुख , हिंदुलाल आबा काकडे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
