संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे गावातील नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या जकात नाक्याच्या थकबाकी संदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते.हनुमान मंदिरासमोरील सभा मंडप येथे हि विशेष ग्रामसभा पार पडली.
ग्रामसभेत हिवरगाव पावसा टोल प्लाझा कंपनीकडून अनेक वर्षांचा मालमत्ता कर थकित आहे.त्यामुळे टोल प्लाझा इमारत सिल करण्याचा ठराव बहुमताने सहमत करण्यात आला.
वारंवार पत्रव्यवहार व प्रशासकीय पाठपुरावा केला परंतु संबंधित कंपनीने थकीत कर अद्याप दिलेला नाही.सन २०१३ पासून थकीत कराची रक्कम रुपये ७,४८,४९०/- इतकी आहे.टोल प्लाझा इमारतीसाठी हिवरगाव पावसा गावातील मोठ्या प्रमाणात जागा हस्तांतरित करण्यात आली.परंतु उभ्या असलेल्या बांधकाम मालमत्तेचा एक रुपया कर अद्याप ग्रामपंचायतला मिळालेला नाही.स्थानिक कामगारांना रोजगार दिलेला नाही.परिसरात बस थांबा नजीक प्रवासी शेडची उभारणी केलेली नाही.अनेक तक्रारी संबंधित टोल प्लाझाच्या आहेत. ग्रामपंचायतचा थकीत कर तात्काळ भरणा न केल्यामुळे, ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत मार्फत इमारत सिल करण्याचा ठराव बहुमताने सहमत करण्यात आला.
सदर ग्रामसभेत टोल प्लाझा महामार्गा लागत परिसरात आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचे जन्मगाव दिशादर्शक फलक लावणे,प्रवासी शेड उभारण्यासाठी पाठपुरावा,
टोल प्लाझा परिसरात हॉटेलचा वेस्टेज कचऱ्याचा प्रश्न सोडवणे इत्यादी अनेक महत्त्वाच्या विषयावर ग्रामसभेत चर्चा झाली.
सरपंच सुभाष गडाख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा पार पडली.विविध विकास कामांचा लेखाजोखा,अहवाल,खर्चाची