देशात अघोषित आणीबाणीस प्रारंभ
आसाम सिटीलाईन मिडिया नेटवर्क घडलेल्या घटनेचा अर्थ लावत लिहीणारे पत्रकार असतात जे पत्रकार सजग असतात ते सत्य मांडतातच त्यातीलच हे तिघे आहेत वरिष्ठ आणि सचोटीचे पत्रकार.अभिसार शर्मा, करण थापर आणि सिद्धार्थ वरदराजन ही त्यांची नावं. त्यांच्या विरोधात आसाम पोलिसांनी गुवाहाटीमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
देशातील बहुतांशी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे आज गोदी मीडिया म्हणून ओळखली जात आहेत.
हे तिन्ही पत्रकार मात्र केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांना थेट प्रश्न विचारतात.केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या व लोकविरोधी धोरणांवर टीका करतात.ते गोदी मीडिया बनू इच्छित नाहीत.
यांच्या टिकेमुळे सत्ताधारी अस्वस्थ होतात, ते चिडतात, संतापतात. त्यांना असे पत्रकार व टीका नको आहेत. सत्ताधाऱ्यांना चाटूगिरीच आवडते. ही टीका थांबवायची कशी? या पत्रकारांचा आवाज बंद कसा करायचा? सरकारला फक्त एकाच मार्ग सुचतो. त्यांना देशद्रोही ठरवायचे व गुन्हे दाखल करायचे. केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या इतर पत्रकारांचीही तोंडे कदाचित अशीच बंद केली जातील.
आज अभिसार शर्मा, करण थापर व सिद्धार्थ वरदराजन यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे.अजित अंजुम, रवीश कुमार वा संदीप चौधरी या पत्रकारांनाही यापुढे अशाच कारवाईला सामोरे जावे लागेल. देशात अघोषित आणीबाणी सुरूच आहे तिचा प्रत्येय आता हळूहळू पुढे येतच राहणार असे वाटू लागले आहे.
