नाशिक दिनकर गायकवाड आपल्याला कोणाचेही पाठबळ आणि राजकीय पार्श्वभूमी नाही यांची कुठलीही सल न बाळगता समाजातील शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न घेऊन शासन दरबारी मांडत त्यांना माणूस म्हणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियमित धडपड करणारे आंबेडकरी चळवळीत नेहमी सक्रिय भूमिका बजावत येथील महेंद्र पगारे यांनी येवला तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आणि इतरांसाठी आश्वासक चेहरा बनले आहे आतापर्यंत त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर घेतलेली आक्रमक भूमिका आणि आंदोलनात्मक लक्ष्यांमुळे त्यांचा ठसा चळवळीत अधोरेखित झाला आहे. बौद्ध,शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, महिला,अपंग, विद्यार्थी अशा विविध समाजघटकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात सातत्याने आवाज उठवणारा लढाऊ कार्यकर्ता म्हणून नाशिक जिल्हा त्यांच्याकडे पाहतो.
देशातील ऐतिहासिक येवला मुक्तीभूमी वरील १३ ऑक्टोबर या धर्मातर घोषणेच्या वर्धापन दिनास वडिलांसोबत लहानपणापासूनच उपस्थिती लावत आल्याने पगारे यांना अबिडकरी चळवळीची आवड निर्माण झाली आणि तिथूनच कार्यकर्ता बाळकडू मिळत गेले,कौलाघात पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रा. सु. गवई, ज्येष्ठ नेते देवराज गरुड, गौतम पगारे यांच्या मार्गदर्शनानुसार गवई गटात प्रारंभी काम करत असतानाच मनोज संसारे यांच्या सामाजिक कायनि प्रभावित होऊन पगारे यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. सुरुवातीपासूनच 'स्वारिप'मध्ये काम करीत असताना त्यांच्यातील आक्रमकपणा हेरुन पक्षाने त्यांची सन २०१० साली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली.
सन २०११ मध्ये बाबासाहेब डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पवित्र अस्थिकलश नागपूरहून मुंबईकडे येवलामार्गे नेण्यात येत होता. ही ऐतिहासिक आणि भावनिक यात्रा मनोज संसारे, पार्श्वगायक आनंद शिंदे, ज्येष्ठ नेते बनश्याम फुसे तसेच सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली ही पात्रा पार पडत होती.याच वेळी, महेंद्र पगारे यांना या अस्थिकलशाला आपल्या डोक्यावर वाहण्याचा सन्मान प्राप्त झाला.ही घटना त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण ठरली अन् त्यांच्या सामाजिक व राजकीय चळवळीला खऱ्या अथनि सुरुवात झाली आणि तिच सुरवात आता लोकहित प्रवर्तक बनत आहे.
धर्मांतर घोषणेनिमित्त येवला शहरात आयोजित लक्षवेधी सभेमुळे महेंद्र पगारे हे अबिडकरी चळवळीतील लढवय्या युवा नेता माणून येवला तालुक्यात चर्चेत आहे.
गेल्या सोळा वर्षांपासून अन्यायाच्या प्रत्येक लाटेला रोखून,समाजहितासाठी न डगमगता उभा असलेला एक निःस्वार्थ भीमसैनिक महेंद्र पगारे, आज येवल्याच्या सामाजिक आणि राजकीय बेटावर दीपस्तंभ ठरत आहे. समाजसेवा हाच जीवनधर्म मानत त्यांनी आपल्या कार्यातून केवळ आंबेडकरी चळवळीला बळ दिले नाही, तर स्वाभिमानाने डोळे भिडवून लढण्याची ऊर्जा नव्या पिढीत संचारली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावी जबाबदारी मिळाल्यानंतर अन्यायाविरोधातील त्यांची लढाई अधिक जोमाने समोर आली असून, त्यांचे धडाकेबाज नेतृत्व येवला तालुक्याला निश्चितच नवे शिखर गाठायला लावेल, याबाबत कुणालाही शंका नाही.
नेते मनोज संसारे आले. या सभेला २०२५ मा खासदार जोगेंद्र कवाडे, अर्जुन डांगळे, नानासाहेब इंदिसे, तानसेन ननावरे आणि भाई जगताप यांसारख्या नेत्यांची उपस्थिती होती.
ते आपल्या प्रभावी आणि शैलीदार वक्तृत्वासाठी ओळखले जातात.त्यांनी विविध राजकीय सभांमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण भाषणशैलीद्वारे उपस्थितांची मने जिंकली आहेत.पगारे यांनी केवळ स्थानिक नेते नव्हे, तर आमदार, खासदार आणि मंत्र्यांसमोरही आपली विचारधारा ठामपणे मांडली आहे. दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा मा. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समोर आक्रमक भाषण केले. त्यांच्या या धाडसी मांडणीचे आणि भाषणशैलीचे कौतुक खुद्द शरद पवार यांनी
केले, ही विशेष बाब, पार्श्वगायक आनंद शिंदे, सिनेअभिनेत्री शाहीर सीमातर्छ पाटील, गायक दत्ता शिंदे, गायक संगीतकार जॉली मोरे, गायक राजा बागूल, मिलिंद मोरे, गायिका नंदा नाग्रेकर, दीपाली शिंदे, शालिनी शिंदे या सारख्या नामवंत गायक, गायिका यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रयोधनाचे काम केले,
महेंद्र पगारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत कोल्हापुरात त्यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराने गौरविण्यात आले. माणुसकी फाउंडेशनचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या यशामध्ये पक्षातील एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांसह सहकारी, जीवलगमित्र विजय घोडेराव यांचे योगदान, खंबीर साथ महत्त्वाची असल्याचे पगारे अभिमानाने सांगतात आणि त्यातूनच ते लोकसंग्राहक बनत गेले
विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व स्मारक सुशोभीकरण तसेच येवला मुक्तिभूमीवरील अनुसूचित जातीच्या जागेवर योग्य सुरक्षारक्षक नेमावा आदी प्रश्नांसाठी पगारे यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्यामुळे शासनाला तत्काळ दखल घ्यावी लागली.त्याचप्रमाणे मुक्तिभूमीवरील अतिक्रमण हटवणे, तसेच मंजूर असलेले वॉल कंपाउंड व तोरण गेट उभारण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत मंत्री भुजबळ आणि बांधकाम विभागाने मंजुरीप्रमाणे काम सुरू केले.
समाजाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलने उभारली आणि संघर्षाच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य केले. विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या
मांडण्यासाठी त्यांनी कांद्याच्या प्रश्नावर मोठे आंदोलन केले. या आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधले आणि आजही ते जनतेच्या चर्चेचा विषय आहे, समाजात सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र यावे, ही त्यांची भूमिका ठाम असून, त्यांनी 'मुक्तिभूमी'वर सर्वसमावेशकता आणि एकतेचा संदेश दिला. याच विचारसरणीच्या आधारावर त्यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि राजरत्न आंबेडकर यांना मुक्तिभूमीवर निमंत्रित केले. या प्रसंगी शनिपटांगण येथे जाहीर सभा घेऊन त्यांनी सामाजिक ऐक्य आणि एकजुटीचा नारा दिला.
गरजूंसाठी अविरत कार्य: तालुक्यात शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्याची परंपरा जपत, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचे काम ते अविरत करताना दिसतात. महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी ४५० हुन अधिक महिलांना न्याय मिळवून दिला. हे केंद्र चालवताना त्यांना सौ.आशा आहेर यांची खंबीर साथ मिळाली, तर पत्नी सौ.ज्योती पगारे यांची पाठिंब्याने त्यांना चळवळीत सक्रिय होता आले. तालुक्यातील अनकुटे सारख्या छोट्या गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये बिनविरोध निवडून येत अध्यक्ष पदाला गवसणी पातलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने आज 'स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या' जिल्हाध्यक्ष पदापर्यंत स्वकर्तृत्वावर मजल मारली आहे ती वाखण्याजोगी आहे.