रावण युवा फाउंडेशनच्या वतीने आंदोलकाना मदतीचा हात
नाशिक दिनकर गायकवाड येथे मागील २६ दिवसांपासून आदिवासी विकास कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच असून, त्याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही.
दरम्यान,आंदोलकांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून,विविध संस्था,संघटनांच्या वतीने आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे केला जात असल्याने आंदोलकांना नवे बळ मिळत आहे.
बेमुदत बिन्हाड आंदोलन सुरू असून, आंदोलकांचे अन्नधान्य, रेशन संपत आले आहे.आता वेगवेगळ्या खेड्यापाड्यां मधून आंदोलकांना धान्य पोहोचविण्याचे काम सामाजिक क्षेत्रातून सुरू झाले आहे. कळवण तालुक्यातून भेंडी पाडा येथील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून धान्य गोळा करण्यात आले. यासाठी सुदाम भोये, फुलाजी
बागूल, सागर बागूल लक्ष्मण गायकवाड, हरिश्चंद्र बागूल, सुरेश बागूल, वसंत बागूल, भारत बागूल आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. गावागावांतून आंदोलकांना धान्य पोहोचवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. रावण युवा फाऊंडेशनच्या वतीने आंदोलकांना मदतीचा हात देण्यात आला. यावेळी सोनू गायकवाड, विकी मुंजे, कुणाल पवार, सुनील कुवर, अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.