नाशिक दिनकर गायकवाड राहत्या घरी पंख्याला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना अमृतधाम येथे घडली. छया रेखांकन-प्रकाश कदम
जागृती सचिन गोसावी (वय २२, रा.गोपाळनगर, अमृतधाम) या तरुणीने राहत्या घरी पंख्याला स्कार्फ बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यावर तिचा भाऊ रुद्राक्ष गोसावी याने तिला प्रथम खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे करीत आहेत.
