नाशिक दिनकर गायकवाड चार महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून २५ वर्षीय युवकाला दोघांनी धारदार शस्त्राने मारून दुखापत केल्याची घटना गणेशवाडी परिसरात घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी प्रमोद वाळू चारस्कर (वय २५, रा. मुंजोबा चौक, गणेशवाडी, पंचवटी) हे दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास देवदर्शनासाठी जात होते.
त्यावेळी आरोपी विक्की बजाज व आकाश चारोस्कर (दोघे रा. गणेशवाडी, पंचवटी) यांनी प्रमोद चारस्कर यांना अडविले. "चार महिन्यांपूर्वी तुमच्या गल्लीत मुलाने मारहाण केली होती. त्यात तू पण होतास," असे म्हणत दोघांनी प्रमोद चारस्कर यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
त्यावेळी आकाश चारोस्करने प्रमोद चारस्कर यांना पकडून ठेवले असता विक्की बजाजने त्याच्या कमरेत अडकवलेली धारदार वस्तू काढून प्रमोद चारस्कर यांच्या डोक्यात जोरात मारून तेथून पळून गेले.या घटनेत प्रमोद चारस्कर यांना दुखापत झाली असून, त्या दोघा आरोपींनी त्यांच्या दुचाकीचेदेखील नुकसान केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार एस. डी. गांगुर्डे करीत आहेत.
