सर्विस रोड वरून जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकले

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड महामार्गावरून दुचाकीवर जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून लांबविल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीन - वाजेच्या सुमारास पुष्पा प्रशांत देवरे (वय ३१, रा. - धात्रक फाटा,पंचवटी, नाशिक) या एमएच १५ एफके ०६८५ या क्रमांकाच्या ॲक्टिव्हा गाडीवरून ओझर बाजूकडून नाशिककडे सर्व्हिस रोडने येत -होत्या.

युनिक फर्निचर मॉलसमोर त्या आल्या असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार - रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला.या प्रकरणी देवरे यांच्या - फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंचमुख करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!