नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील देसराणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वर्षा रविंद्र हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आवर्तन पद्धतीनुसार कुंदन भारत हिरे यांनी उपसरपंच पदाबा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले.त्यामुळे येथील ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यात उपसरपंचपदासाठी वर्षा हिरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी वर्षा हिरे यांना सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य सचिन लक्ष्मण बहिरम उपस्थित होते.वर्षा हिरे यांची बिनविरोध निवड झाल्याने गावाच्या वतीने पंडित शंकर पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सरपंच भगवान वाघ ग्रामपंचायत सदस्य कुंदन हिरे, सचिन बहिरम, शिवदास पवार, मंगेश सोनवणे, सदस्या सिंधुताई बहिरम, माई गांगुर्डे, स्वप्ना खरे, शानुबाई सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी संतोष खेडकर, काँगेसचे महेद्र केदाजी हिरे, संतोष नेवबा हिरे, सतीश कुबर, कारभारी हिरे, दादाजी हिरे, निलेश शेवाळे, अमोल हिरे, योगेश हिरे, विक्रम खरे, माधव जाधव, विश्वास हिरे, जगदीश खरे, शशी हिरे आदी उपस्थित होते.