नाशिक दिनकर गायकवाड कळवण आगाराची बस सेवा सुरगाणा तालुक्यातील केळावण गावाला सुरू करण्यात आल्याने नागरिकांसह विद्याथ्यर्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अंबुपाडा, बान्हे,माणी,सुरगाणा येथे विद्यार्थ्यांचे अनेक वर्षांपासून शाळेतील ये जा करण्यासाठी मोठी समस्या होती. ती समस्या कळवण आगार व्यवस्थापक राहूल बोरसे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक वसंत लव्हारे, सुरगाणा वाहतूक नियंत्रक किशोर चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अहिल्याबाई होळकर मोफत कन्या पास, मानव विकास पास ही सेवा
उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना फायंदा होणार आहे. सुरगाणा येथून ही बस पहिली फेरी सकाळी ६.३० सुटेल ते केळवण सकाळी ७. ३० वा पोहचेल, दुसरी फेरी सुरगाणा येथून दुपार नंतर ४.३० सुटेल ते संद्याकाळ ५.३० पर्यंत केळावण येथे पोहचेल,
केळावण भिवतास धबधबा येथे बसला श्रीफळ फोडून केळीचे पाने लावून पूजा करण्यात आली. याप्रसंगी पोलीस पाटील विजय चौधरी, कैलास चौधरी, परशराम पाडवी, चिंतामण भोये, युबराज चौधरी, चंदर बागुल, रामदास पाडवी, बाबुराव राऊत, हंसराज खुरकुटे, अशोक बागुल आदींहसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.