नाशिक दिनकर गायकवाड शहर परिसरातून महिलांच्या गळ्यांतील मंगळसूत्रे लांबविल्याच्या दोन विविध घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सोनसाखळी चोरीची पहिली घटना टाकळी रोडवर घडली. फिर्यादी चंद्रभागा नारायण अंभोरे (वय ५५, रा. टाकळी रोड, गांधीनगर, नाशिकरोड) या दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास टाकळी रोडवरील इंद्रायणी बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्यावेळी हेल्मेट घातलेले दोन इसम मोटारसायकलीवरून त्यांच्या पाठीमागून आले. गाडीवर मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील २२.१४० ग्रॅम वजनाचे १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून ते पळून गेले. या प्रकरणी अंभोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास
करीत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे
सोनसाखळी चोरीची दुसरी घटना बिटको रोडवर घडली. फिर्यादी किरण वसंत समेळ (वय ६५, रा. ईरन गार्डन सोसायटी, नाशिक-पुणे रोड, नाशिक) यांच्या ८८ वर्षीय आत्या एका महिलेसमवेत दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास औषध खरेदी करून पायी जात होत्या. बिटको रोडवरील गंधर्वनगरी चौकात त्या आल्या असता त्यांच्यामागून दोन अनोळखी इसम दुचाकीवरून आले आणि आत्याच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची एक लाख रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पळून गेले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.