कोल्हार प्नतिनिधी 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने लोणी प्रवरानगरच्या भूमीत सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभा केलेला आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला.भारतात सहकार चळवळीची मुहूर्तमेढ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनीच रोवली.त्यामुळे त्यांना सहकारमहर्षी म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे त्याचे खरे श्रेय पद्मश्री डॉ. विखे पाटील यांनाच द्यावे लागते. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध झाला.' असे गौरवोदगार पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कारप्राप्त लेखक मा. प्राचार्य.वसंत ठोंबरे यांनी काढले.
कोल्हार येथील 'लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 'कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२५ वी जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य वसंतराव ठोंबरे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संभाजीराजे देवकर पा.होते.
आपल्या प्रमुख भाषणात प्राचार्य ठोंबरे यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे योगदान किती महत्वाचे आहे हे सांगताना लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री नामदार. राधाकृष्ण विखे पा.मा.खा.डॉ. सुजय विखे पा,अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्ष्या सौ.शालिनी विखे पा यांच्या सामाजिक कार्याचे महत्व पटवून दिले.आपल्या अध्यक्षीय भाषणात. संभाजीराजे देवकर यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी केले. प्रा. उत्तम येवले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. प्रकाश पुलाटे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रणिता जाधव व प्रा. मनीषा जडितके यांनी केले.या कार्यक्रमासाठी.. बाबासाहेब दळे पाटील. साहेबराव दळे, भगवतीपूरचे उपसरपंच. प्रकाश खर्डे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कक्षाधिकारी बाळासाहेब कामठे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.