नाशिक प्रतिनिधी कृषी विभाग,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र या उपक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते नुकतेच झाले.
स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा आणि ग्राहकांना ताजे व गुणवत्तापूर्ण उत्पादन थेट मिळावे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
या सोहळ्या वेळी मंत्रीमंडळातील सहकारी मंत्री नरहरी झिरवळ, दादा भुसे आणि.आमदार खोसकर यांच्यासह कृषी क्षेत्रातील अधिकारी, शेतकरी बांधव आणि बचतगट मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो, थेट विक्रीमुळे त्यांना आर्थिक लाभ मिळतो आणि ग्राहकांपर्यंत स्थानिक पातळीवरील आरोग्यदायी उत्पादन पोहोचते, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.