श्रीरामपूर दिपक कदम शहरातील खिलारी वस्ती,कांदा मार्केट,कौशल्यनगर या रहिवाशी परिसरातून भरघाव वेगाने जाणाऱ्या जड वाहनांबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदरची रहदारी त्या भागातून बंद करण्याचे आश्वासन मा. खासदार डॉ.सुजय विखे पा. यांनी दिले.
डॉ.विखे यांची या परिसरातील नागरिकांनी भेट घेऊन निवेदन दिले.त्यावेळी खिलारी वस्ती,कांदा मार्केट व कौशल्यानगर भागातून भरघाव वेगाने खडी,मुरूम व इतर गौण खनिज वाहतूक करणारी जड वाहने या भागातून रात्रंदिवस जातात.त्यामुळे या भागातील रस्त्यावर खड्डे पडले असून पायी जाणे मुश्किल झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या भागात दोन हॉस्पिटल,मंदिर,मंगल कार्यालय, बँक,विद्यार्थ्यांची क्लासेस व रहिवासी भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यासंदर्भात आम्ही प्रांत अधिकारी किरण सावंत यांची भेट घेतली असता त्यांनीही निवेदनास केराची टोपली दाखवून याबाबत काहीही कारवाई केली नसल्याचे सांगितले.तसेच पोलीस अधिकारी यांनाही समक्ष भेटून या परिसराची कैफियत मांडली व निवेदन दिले,
तरी आजपर्यंत या वाहनांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.वाहतूक करणाऱ्या या जड वाहनांमधील काही स्टोन क्रेशर बेकायदेशीर चालू असल्याचे.राजेंद्र पानसरे यांनी म्हटले आहे.या जड वाहनामुळे मोठा अपघात होऊ शकतो.
सदर वाहनांसाठी दुसरा पर्यायी मार्ग असून त्या मार्गे वाहतूक वळवावी असे म्हटले आहे.यापुढील काळात जड वाहने या भागातून जावू नयेत याकरिता बंदी घालावी,अशी मागणी करण्यात आली.यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी सदरचा प्रश्न गंभीर असून या संदर्भात आपण संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन नागरिकांना दिले.
यावेळी राजेंद्र पानसरे, माजी मुख्याध्यापिका पुष्पा शिंदे,इंदू नन्नवरे,सचिन जगताप,भरत कोठारी, नामदेव नन्नवरे,ऋषिकेश नवले,मोहन कोऱ्हाळे,वसंत गागरे,संजय सोनार,सोमनाथ निर्मळ सर,अमोल जोशी,योगेश गंगवाल सुभाष मुरकुटे डॉ. महेश क्षीरसागर,डॉ. गणेश जोशी वाल्मीक सरोदे जयवंत वाघचौरे संपत देशमुख संदीप दोडकर, नंदलाल गंगवाल,पेटकर, कोल्हे,सोपानराव लबडे, बाबासाहेब थोरात,दिलीप डोखे,सुहास धनीधर,रवींद्र कांबळे,दिनेश कुलकर्णी, शंकर आव्हाड,रमेश नवले आदी नागरिकांच्या सह्या आहेत.