मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच मंत्रालयात शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक पार पडली.
या बैठकीला आमदार जयंत आसगावकर यांच्यासह आमदार विक्रम काळे,आमदार ज. मो. अभ्यंकर,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार सतीश चव्हाण,आमदार अभिजीत वंजारी,आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश राठोड, आमदार सत्यजित तांबे, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत खालील विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
१) संचमान्यतेचा विषय न्यायप्रविष्ट असून कोर्ट निकालानंतर शिक्षण आयुक्तांसमवेत आमदार महोदयांची बैठक घेऊन त्यातून सकारात्मक तोडगा काढण्याचे ठरले.
२) अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचे ठरले.
३) टप्पावाढीचा आदेश येत्या 4 दिवसात काढण्याचे ठरले.
४) शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत लवकरच सकारात्मक पाऊल उचलले जाईल असेआमदार प्रा.जयंत आसगावकर यावेळी सांगितले.