सेंद्रिय कर्ब हा शेतीचा आत्मा डॉ.विठ्ठलदास आसावा

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे-शेतकऱ्यांच्या शेतातील सेंद्रिय कर्ब हा शेतीचा आत्मा असून त्याचे प्रमाण जमिनीची गुणवत्ता सिद्ध करत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासन कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ.विठ्ठलदास असावा यांनी झरेकाठी येथे केले.
श्रमशक्ती कृषी महाविद्यालय कृषीदूत आयोजित भव्य शेतकरी मेळावा नुकताच झरेकाठी येथे पाडला.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.आसावा बोलत होते.मंचावर कर्नाटक आनंद ॲग्रो विस्तार अधिकारी खंडेराव धारराव ,श्रमशक्ती महाविद्यालय अधिकारी प्रा.डॉ.जे.बी. धांगडा, कृषिपर्यवेक्षक डी.एन. पोखरकर,कृषि सहायक एस. बी. गायकवाड, स्वप्नील पाटील, प्रांजल कवडे,सरपंच अशोक वाणी आदि मान्यवर उपस्थित होते.

शेती उत्पन्न व्यतिरिक्त शिल्लक राहणारा काडी कचरा, पालापाचोळा शेताबाहेर न काढता किंवा पेटवून न देता 'तेरा तुझको अर्पण' या उक्तीप्रमाणेच शेतीला परत करा असे कळकळीचे आवाहन डॉ. आसावा यांनी केले. शेतीला भूमाता म्हणून संबोधन करताना तिच्या मायेचा पदर जाळून टाकू नका.

स्वतःचे शेतातील काडीचा अनुभव सांगताना ऊस शेतीतील वाढे तोडीवाला नेतो तर खोडकी सरपणाला वापरली जाते. निदान पाचट तरी मला का? नको ही जमिनीची हाक शेतकऱ्यांनी ऐकली तर सेंद्रिय कर्ब सहज उपलब्ध होऊन पर्यावरण संतुलन आणि वन्यजीव संरक्षण होईल.खर्चात काटकसर टाकाऊ पदार्थाचा पुनर्वापर आणि कमी मनुष्यबळ वापर या त्रिसूत्रीचा वापर करत जमिनीचे व्यवस्थापन करून जलधारण क्षमता वाढवावी असे डॉ.आसावा यांनी सांगितले.

यावेळी कृषीदुत गणेश लबडे, कृष्णा लाहोटी,शिवाजी सोनवणे ,पृथ्वीराज रसाळ ,स्वप्नील शिंदे ,पवन खतोडे ,सुशांत नवले,आदित्य राऊत ,विवेक रौंदळ,ओम शेजुळ ,अभिषेक ढोले ,रोशन ढोमसे यांनी शेतकरी मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.प्रसंगी परीसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!