अहिल्यानगर प्रतिनिधी येथील क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सिने अभिनेत्री खुशी माळी,भाजपचे जेष्ठनेते.अभय आगरकर,भाजपा शहराध्यक्ष अनिल मोहिते,मा नगरसेवक सचिन पारखी, भैया परदेशी.संपत नलवडे यांच्यासह आदी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, दहीहंडी प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त साजरा होणारा दहीहंडी उत्सव हा उत्साह, एकोपा आणि परंपरेचे प्रतीक आहे.युवकांनी हाती घेतलेल्या या उत्सवात परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी, संघटनशक्ती आणि ऊर्जेचे दर्शन घडले. सांस्कृतिक आणि पारंपरिक अशा या उत्सवात उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते,तसेच मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांमुळे कार्यक्रम अधिकच भव्यदिव्य झाला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजक भाजपा मध्यमंडल अहिल्यानगर अध्यक्ष पै.मयुर बोकुडघोळ यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले त्याबद्दल त्यांचे राम शिंदे यांनी कौतुक आणि अभिनंदन केले.
