कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज महाराज नुतन पोलिस संकुलाच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्त

Cityline Media
0
कोल्हापूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर येथील जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत उभारलेल्या 'राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल’ या नूतन निवासी इमारतीतील काही सदनिकांच्या चाव्या प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना देण्यात आल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार धैर्यशील माने,आमदार सर्वश्री राजेश क्षीरसागर,चंद्रदीप नरके, राजेंद्र यड्रावकर,अमल महाडिक,शिवाजी पाटील, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सदनिकांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले व या सदनिका दर्जेदार झाल्याचे गौरवोद्गार काढले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुरुंदवाड येथे उभारलेल्या पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

१६८ शासकीय निवासस्थाने बांधण्याकरिता शासनाकडून सुमारे ३४ कोटी ६२ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!