नाशिक दिनकर गायकवाड कंपनीचे वॉल कंपाऊंड तोडून कंपनीतील सुमारे ३० लाख रुपये किमतीचे स्टील पाईप व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अंबड एमआयडीसीत घडली.
याबाबत श्रीकांत श्रीकुमार कारनावर (रा.द्वारका रेसिडेन्सी, पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. कारनावर हे अंबड एमआयडीसीतील रूट्स फॉर्मालेशन प्रा. लि. कंपनीचे काम पाहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की दि. २६ ते २७ जुलै दरम्यान अज्ञात इसमाने कंपनीचे वॉल कंपाऊंड तोडून कंपनीच्या आवारात प्रवेश केला.
तेथे असलेले ६७ हजार रुपये किमतीचे दीड मीटर लांबीचे स्टील पाईप, ५० हजार रुपये किमतीचे ३५० नग स्टील एल्बो, ४५ हजार रुपये किमतीचा २०० इंचांचा स्टील पाईप, ६७ हजार ५०० रुपये किमतीचा ३५० इंच स्टेनलेस स्टील पाईप, ३५ हजार रुपये किमतीचे
स्टेनलेस स्टील कटपीस, दहा हजार रुपये किमतीचा स्टेनलेस फनेल, सहा हजार रुपये किमतीचा आणखी एक फनेल, दहा हजार रुपये किमतीचा एक लोखंडी पाईप व पाच हजार रुपये किमतीचा एक लोखंडी एल्बो असे एकूण ३० लाख ५ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार साळवे करीत आहेत.