मुकणे पाणी पुरवठा योजनेच्या खुल्या निविदानंतर २० ऑगस्ट पर्यंत संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन

Cityline Media
0
-३९५ कोटींच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेस शासनाची मंजुरी.
 -साधुग्रामपर्यंत येणार पाणी 

नाशिक दिनकर गायकवाड येथील मुकणे पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळाली असून,नुकतेच या कामाबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात येत आहे. भूसंपादनासह या योजनेचा खर्च तब्बल ३९५ कोटींपर्यंत जाणार आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सिंहस्थासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.या निधीतूनच मुकणे पाणी पुरवठ्यावर खर्च केला जाणार आहे. या योजनेतून विल्होळी येथे २८४ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारून सिंहस्थासाठी विल्होळी ते साधुग्राम दरम्यान गुरुत्व जलवाहिनी द्वारे पाणी आणले जाणार आहे.

या पाणीपुरवठा योजनेमुळे आगामी कुंभमेळ्यासह पंचवटी, द्वारका परिसरातील पाणी पुरवठ्याचा बराच ताण कमी होणार आहे. दरम्यान,निविदा खुली केल्यानंतर २० ऑगस्ट पर्यंत संबंधित संस्थांना सहभागी होता येणार आहे. अटी शर्ती पूर्ण करणारी संस्था पात्र ठरेल.

मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथे पंपिंगची क्षमता वाढवून २०३६ पर्यंतच्या लोकसंख्येला पाणी पुरवण्याचे नियोजन आहे. सिंहस्थावेळी शहरात एक कोटी भाविक येण्याचा अंदाज असल्याने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून २०३६ पर्यंतच्या लोकसंख्येला पुरेल या दृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे.

शहरात दिवसाला ५८० दशलक्ष घनफूट तर वर्षभरात ६२०० दशलक्ष घनफूट पाणी लागते. यात गंगापूर धरणातून ४५०० दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून २०० तर मुकणे धरणातून १५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण नोंदविले आहे. दोन वर्षांमध्ये कुंभमेळा होणार असून पर्वणी काळात १ कोटी तर वर्षभरात ५ कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

गंगापूर धरण हे गाळाने भरले असल्यामुळे येथून अतिरिक्त पाणीपुरवठा होऊ शकत नाही. दारणा धरणामधून थेट जलवाहिनी नसल्यामुळे पाणी आणण्यात अडचण येते. या पार्श्वभूमीवर मुकणे पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करणे महत्त्वाचे आहे. विल्होळी येथे २७४ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र आता निर्माण केले जाणार आहे.यासाठी प्रारंभी ४०२ कोटींचा असता तो आता ३९५ कोटींवर आला आहे.

विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र उभारल्यानंतर तेथून साधुग्रामपर्यंत मुख्य गुरुत्ववाहिनी अर्थात थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजित आहे. त्यासाठी चारशे कोटींचा खर्च आहे. तर मुकणे पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून सिंहस्थांतर्गत निधीतून खर्च केला जाणार आहे. या कामासाठी दोन वर्षांच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. त्याद्वारे पहिल्या टप्प्यात जेवढा खर्च येईल, त्यानुसार खर्च होईल.

या योजनेसाठी ३९५ कोटींचा खर्च होणार असल्याचे नाशिक महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!