नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने अखेर प्रारूप प्रभाग रचना काल नुकतीच जाहीर केली आहे. यात एकूण ३१ प्रभाग असून त्यात १२२ नगरसेवक असणार आहेत.
ही प्रभाग रचना सन २०१७ प्रमाणेच असून २९ प्रभागांत ४ सदस्य, तर प्रभाग क्रमांक १५ व १९ मध्ये ३ सदस्य असणार आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. दरम्यान दिवाळीनंतर होणाऱ्या या नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ३१ प्रभाग असणार आहेत. यातील २९ प्रभाग ४ तर २ प्रभाग ३ सदस्य ठेवण्यात आले आहे.
सन २०१७ प्रमाणे एकूण १२२ नगरसेवक निवडले जाणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सन २०११ च्या जनगणनेनुसार ही
हालचालींना येणार वेग
नाशिक महानगरपालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट असून निवडणूक कधी होणार, याकडे राजकीय पदाधिकारी, कार्यकत्यांचे लक्ष लागले होते. अखेर काल नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्याने हालचालींना आता अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
प्रभागरचना जाहीर झाली आहे. शहराची मतदार संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. त्या आधारे ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. १२२ सदस्यांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान एका प्रभागासाठी पन्नास ते पंचांवन्न हजार मतदार संख्या असणार असून ती गेल्या वेळेस पेक्षा प्रत्येक प्रभागात दहा ते पंधरा हजारांनी वाढली आहे. दरम्यान काल जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात ज्या नागरिकांना हरकती किंवा सूचना असतील त्यांना आज (दि.२३) ते बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५ या कालावधील कार्यालयीन वेळेत मनपाच्या मुख्य कार्यलयात अथवा विभागीय कार्यालयात नागरिकांकडून येणाऱ्या लेखी स्वरुपातील हरकत स्विकारल्या जाणार आहे.
