पोलीस निरीक्षक विजय करे यांचे आवाहन
नाशिक दिनकर गायकवाड गणेशोत्सव उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा करतांना पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचना आणि आदेशांचे पालन करावे, गणेशोत्सवाचे पवित्र जपावे, पारंपरिकतेला प्राधान्य देऊन जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी आक्षेपार्ह सजावटी, बॅनर लावू नये,असे आवाहन मनमाडचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलीस ठाण्यातर्फे शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. गणेश मंडळांना परवानगी ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे, तसेच धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय वर्गणी संकलन करू नये, तसेच महावितरण, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता आदी विविध सेवा तत्पर ठेवाव्यात, महावितरणने विविध भागात दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घ्यावीत, वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी आदी सूचना करण्यात आल्या.
यावेळी शांतता समितीचे सदस्य अशोक व्यवहारे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक, नाना शिंदे. माजी
नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, शिवसेनेचे अल्ताफ खान, शहरप्रमुख मयूर बोरसे, रिपाईचे गंगादादा त्रिभुवन आदींनी विविध सूचना मांडल्या.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेश भावसार, मंडल अधिकारी सोपान गुळवे, तलाठी राहुल माळी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भूषण तळेले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. योगेश देवरे,दत्तू कारंडे, नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी पुष्पक निकम आदींसह सर्व स्तरातील नागरिक व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
