शिवसेनेच्या ऐतिहासिक बंडानंतर अकोले तालुक्यातुन सर्वाधिक शिवदूतांची नोंद
अकोले (प्रतिनिधी) शिवसेना म्हणजे शी म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी ना म्हणजे नामर्दाना जिच्यात स्थान नाही ती म्हणजे शिवसेना होय या शिवसेना पक्षात कित्येक वर्ष निष्ठेने आपल्या खांद्यावर झेंडा घेणारे शिवसैनिक आहेत. त्यापैकी एक शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ बाजीराव यादव यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजा हरिश्चंद्राच्या नगरीमध्ये शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे येत आहेत त्यांचे हार्दिक स्वागत केलं. मात्र स्वागतास सोबतच प्रचंड इच्छा देखील व्यक्त केली.
श्री.यादव म्हणाले की शिवसेनेच्या ऐतिहासिक बंडा नंतर ज्यांनी आपल्याला साथ दिली गद्दारीचा शिक्क पचवून सुद्धा आपला झेंडा छातीवर घेतला अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम भाग आहे या आदिवासी दुर्गम भागात ज्या मोजक्या पाच-सहा लोकांनी सुरुवातीला पक्ष स्थापन झाल्यानंतर ५०० मावळे तयार केले.
त्या शिवसैनिकांना त्या पदाधिकाऱ्यांना एकदा तरी प्रेमाने विचारावं शिवसेनेच्या ऐतिहासिक बंडा नंतर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक शिवदूतांची नोंद अकोले तालुक्यात झाली फक्त नोंदच झाली नाही तर दसरा मेळावा आणि वर्धापन दिनाला व शासन आपल्या दारी कार्यक्रमाला सर्व शिवधूत उपस्थित राहिले.
ऐतिहासिक बंडा नंतर पक्षांवर दिलेले सर्व उपक्रम अकोले तालुक्यात थाटामाटाने सर्वांनी एक दिलाने साजरे केले अकोले तालुक्यातील सर्व बुथ यंत्रणा सक्षम केली सर्व सेलचे आणि सर्व प्रकारचे पदाधिकारी उत्तम प्रकारे नियुक्त केले एकीने राहीले फाटके तुटके कार्यकर्ते
सुद्धा स्वाभिमानाने आपले काम करत राहिले त्यांनी आपली निष्ठा जपली अशा या निष्ठावंत शिवसैनिकांना आपण एकदा तरी जवळ घ्यावं फक्त प्रतिष्ठावंतांच्या आग्रहा खातर नव्हे तर निष्ठावंतांच्या प्रेमाखातर एकदा तरी त्यांना साथ घालावी आपल्या पडतीच्या काळात त्यांची साथ मोलाची होती.
हा संदेश महाराष्ट्रात जाईल निष्ठावंत खंबीरपणे पाठीशी उभे राहिले तर ते कायम टिकून राहतील परंतु प्रतिष्ठावंत जिकडे शासन तिकडे कधी पळतील हे पण कळायचं नाही.अकोले तालुक्यासाठी आपण भरघोस निधी द्यावा त्या निधीचा विनीयोग फक्त आणि फक्त सामान्य जनता केंद्र मानून व्हावा योग्य हातांना बळ योग्य हातांमध्ये फळ जर दिलं तर ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकेल.
अयोग्य हातात गेलेले फळ फक्त आणि फक्त धनदांडग्यांना सक्षम बनवत असते याचा संदेश निष्ठावंत आणि सामान्य जनांमध्ये जर गेला तर पक्षाची प्रतिमा मलिन होत असते. बाळासाहेबांनी संदेश दिलेला आहे पैसा गेला तर परत कमावता येतो परंतु नाव गेले तर परत कमावता येत नाही शिवसेना नावाला जपा.
आपण वंदनीय बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार आहात म्हणूनच या विचारांनी प्रतिष्ठावंतांच्या साखळ दंडातून बाहेर येत निष्ठावंतांच्या गुलाब पुष्पहार मध्ये एकदा तरी अकोल्याच्या नगरीत आल्यावर भेटावं यातच पक्षाचा बाळासाहेबांच्या विचारांचा निष्ठावंतांच्या कष्टाचा आणि आपल्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या मायबाप जनतेचा विश्वास अधिक वाढेल.
शेवटी माध्यमांशी बोलताना एकनाथ यादव यांनी अकोल्याच्या नगरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले आणि म्हणाले गर्दीच्या दुनियेमध्ये हरवत चाललेला निष्ठावंत शिवसेना शिवदूत शिवसैनिक आणि तुमच्या बंडाच्या काळात झालेले पदाधिकारी यांना विसरू नका अवश्य भेटा हेच आपले शेवटपर्यंतचे साथीदार असतील.