जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,दिव्याशा तर्फे दिव्यांग व्यक्तीला बॅटरीवरील सायकलचे वितरण

Cityline Media
0
श्रीरामपूर  दिपक कदम डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर यांच्यामार्फत आणि मा.खासदार डॉ.सुजय विखे यांच्या विशेष सहकार्यामुळे नुकतेच श्रीरामपूर येथील कु.दर्शना पापडीवाल या दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व नोकरी करिता बॅटरीवरील सायकल प्रदान करण्यात आली.
श्रीरामपूर मूकबधिर विद्यालयाचे वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांच्याकडे महेश दिघे यांनी कु.दर्शना पापडीवाल हिला बॅटरीवरील सायकल देण्याची विनंती केली.त्यानुसार. साळवे यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक डॉ.दीपक अनाप यांचेशी संपर्क साधून तातडीने बॅटरीवरील सायकल देण्याचे नियोजन करण्यात आले.

कु.दर्शना पापडीवाल हिला संजय साळवे यांनी खाजगी नोकरी लावून दिलेली आहे. तिचा सामाजिक,आर्थिक पुनर्वसन करण्याचे मोलाचं काम त्यांनी केलेले आहे. नोकरीला जाण्यासाठी यापूर्वी साधी सायकल देण्यात आली होती. परंतु साधी सायकल वापरण्यास अडचण निर्माण होत होती आणि दर्शना 80 टक्के दिव्यांग असल्या कारणाने तिला बॅटरीवरची सायकलची नितांत गरज होती ती मागणी डॉ.विखे पाटील फाऊंडेशनने तातडीने मान्य केली आणि नुकतेच तिला तिच्या सामाजिक पुनर्वसनासाठी बॅटरी वरील सायकल एक जीवनदाईनी ठरली आहे.आज कार्यालय बंद असताना देखील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक .डॉ.दीपक अनाप यांनी विनविलंब पूर्तता केली.

सदर उपक्रमासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ.अभिजीत दिवटे,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, विशाल पापडीवाल जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सृजन भालेराव समन्वयक डॉ.अभिजीत मिरेकर प्रवीण कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!